शिरूरमध्ये कृषी केंद्रात कोयता हल्ला: तिघांनी माजवली दहशत, गुन्हा दाखल
Updated On:

शिरूर – शिरूर शहरातील विशाल कृषी सेवा केंद्रात ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी तिघांनी कोयता आणि कात्रीने दहशत माजवली. “तहसीलमध्ये आमची तक्रार करतोस का?” असे म्हणत त्यांनी संतोष पाचर्णे (वय ४२, रा. तरडोबाची वाडी) यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी परवेश उर्फ पाप्या पठाण, रुपेश चित्ते आणि ओंकार जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संतोष आणि दुकानमालक शिवम शिंदे काम करत असताना आरोपी आले. ओंकारने दमदाटी केली, तर पाप्याने कात्रीने संतोषच्या हातावर-पायावर वार केले. रुपेशने कोयता फिरवून परिसरात दहशत पसरवली, ज्यामुळे दुकाने बंद झाली आणि लोक पळाले. आरोपींनी संतोषच्या डोक्यावरही वार केला. आरडाओरड झाल्यावर ते पळाले. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार साबळे तपास करत आहेत.





