SCO Summit: अमेरिकेला बाजूला करत भारत ३ शक्तिशाली देशांच्या यादीत ; कोणी केली ही घोषणा? , वाचा
SCO Summit: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या व्यासपीठावर बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी भारताचे भरभरून कौतुक केले आहे.

SCO Summit: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या व्यासपीठावर बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी भारताचे भरभरून कौतुक केले आहे. आपल्या भाषणात त्यांनी भारताचा जगातील शक्तिशाली देशांच्या यादीत समावेश केला.
आश्चर्याची बाब म्हणजे त्यामध्ये त्यांनी अमेरिकेचे नाव घेतले नाही. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक याठिकाणी आयोजित SCO शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत.
बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष यावेळी बोलताना,”आपण किती समान आहोत हे महत्त्वाचे नाही. आम्ही मानतो की चीन, रशिया आणि भारत हे तीन शक्तिशाली देश आहेत. हे तिन्ही आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली आण्विक देश आहेत.” असे त्यांनी म्हटले. मंगळवारी झालेल्या SCO शिखर परिषदेत दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी मापदंड स्वीकारणे अस्वीकार्य असल्याचे घोषित करण्यात आले.
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांचा निषेध SCO Summit:
संयुक्त निवेदनात, SCO सदस्य देशांनी पश्चिम आशियातील घडामोडींवर तीव्र चिंता व्यक्त केली आणि इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांचा निषेध केला. या निवेदनाला बिश्केक घोषणा असे नाव देण्यात आले आहे.
SCO मध्ये रशिया, चीन, भारत, पाकिस्तान, इराण, बेलारूस, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान यांचा समावेश आहे. या घोषणेमध्ये म्हटले आहे की, सदस्य देशांनी दहशतवादी आणि फुटीरतावादी हेतूंसाठी इंटरनेटचा वापर रोखण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे. सदस्य देश आंतरराष्ट्रीय माहिती सुरक्षा, माहिती संरक्षण आणि नवीन प्रकारच्या गुन्ह्यांशी लढा देण्याच्या क्षेत्रात परस्पर समन्वय मजबूत करतील.
दहशतवादावर पाकिस्तानला आरसा SCO Summit:
शिखर परिषदेत भारताने सुरक्षा क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यावर आणि दहशतवाद आणि अतिरेकीसारख्या आंतरराष्ट्रीय धोक्यांना तोंड देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला.
परराष्ट्र मंत्रालयाने 13 निर्णयांची माहिती दिली, त्यापैकी एक म्हणजे SCO सदस्य देशांच्या सुरक्षेला आव्हाने आणि धोक्यांना सामोरे जाण्यासाठी सार्वत्रिक केंद्राच्या नियमांना मान्यता देणे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींनी या शिखर परिषदेत सांगितले की, जे देश दहशतवादाचा सरकारी धोरण म्हणून वापर करतात त्यांचा सामना करावा.






