School Timing : मोठी बातमी..! ‘या’ शहरातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; काय आहे कारण?
School Timing : शहरातील मनपा (PMC) आणि सर्व खाजगी प्राथमिक शाळांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे.

School Timing : पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील मनपा आणि खासगी प्राथमिक शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत सर्व प्राथमिक शाळा सकाळी 7.00 ते दुपारी 12.15 या वेळेत भरतील. (School Timing)
हा निर्णय भारत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेसाठी शिक्षकांना वेळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याचीही काळजी घेण्यात आली आहे. (School Timing)
यापूर्वीही विद्यार्थ्यांची झोप पूर्ण व्हावी या उद्देशाने तत्कालीन राज्यपाल रमेश बैस यांच्या सूचनेनुसार शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला होता. आता निवडणूक आयोगाच्या विशेष मोहिमेमुळे पुन्हा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. (School Timing)
पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे आणि उपआयुक्त वसुंधरा बारवे यांनी सर्व मनपा व खासगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना या बदलाची माहिती तातडीने पालकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही.(School Timing)
भारत निवडणूक आयोगाने 14 मे 2026 रोजी महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक करण्यासाठी अनेक शिक्षकांची बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.(School Timing)
याच पार्श्वभूमीवर शिक्षकांना शैक्षणिक कामकाज आणि निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडता यावी, यासाठी शाळांच्या वेळेत हा तात्पुरता बदल करण्यात आला असून, तो 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. (School Timing)






