पुणे जिल्हा | शिंदेवाडी-एकलहरेत शालेय प्रवेशोत्सव उत्साहात

मंचर, (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंदेवाडी-एकलहरे (ता.आंबेगाव) येथे शालेय प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास शिंदे होते.
नवागत तीन विद्यार्थ्यांचे औक्षण ग्रामपंचायत सदस्या विमल शिंदे, उपाध्यक्ष कांचन शिंदें यांनी केले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शिंदे, कृषी सोसायटी संचालक बाळासाहेब शिंदे , व्यवस्थापन समिती सदस्य अनिल पारधी यांचे हस्ते मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आले.
ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान, कळंबचे द्वारा उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना वही व उजळणी पुस्तक भेट देण्यात आले. दाधरादेवी प्रतिष्ठान, मंचर यांनी उपस्थित सर्वांना मिष्टान्न भोजन दिले. मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे यांनी प्रास्ताविक केले. दत्ता गोरडे यांनी सूत्रसंचालन केले. तर, अंगणवाडी सेविका जयश्री आग्रे यांनी आभार मानले.





