Scholarship Exams: शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी 2 मे पर्यंत मुदत, परीक्षा 20 जुलैला
Updated On:

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी 2 मे पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून यानुसार 20 जुलै रोजी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे.
या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी 23 ते 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढही आता संपली आहे. यानंतर आता ऑनलाइन अथवा ऑफलाइन अर्ज भरता येणार नाहीत. मुदतीत अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सात लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.





