पुणे जिल्हा | श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने विद्यार्थींना शिष्यवृत्ती वाटप

पिरंगुट, (वार्ताहर) – खारावडे (ता. मुळशी) येथील श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सोहळा मंदिर परिसरामध्ये उत्साहात झाला. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने परिसरातील जवळपास 25 गरजू विद्यार्थ्यांना 3 लाख रुपये शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
तसेच विद्या विकास मंदिर आंदगाव शाळेला मदत म्हणून 50 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. खारावडे येथील प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर लागणारे सर्व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने गेल्या 25 वर्षांपासून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप सुरू आहे. परिसरातील गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून हे मदत केली जाते, असे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मधुरा भेलके यांनी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी प्रा. गणेश शिंदे यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी उपस्थित मध्ये देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मधुरा भेलके, डी. एल. एज्युकेशन डायरेक्टर शाम लेले, योगेश देशपांडे, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश जोगावडे, सचिव शंकर मारणे, खजिनदार लक्ष्मण मारणे, उमा मारणे, विश्वस्त विष्णुपंत जोगावडे, संभाजी गावडे, अनिल सोनवणे, माऊली साळेकर, मारुती माने, नरेश मारणे, हर्षल मारणे, लक्ष्मण शेडगे, प्रवीण शेडगे, विश्वास जोगावडे, श्रीकांत ओसाडकर, विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.





