“लाडक्या बहिणींसाठी योजना, मग दाजींसाठी काय?”, अमोल कोल्हेंचा राज्य सरकारला सवाल

Amol kolhe On Ladki Bahin Yojana| राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली जाणार आहे. त्यानुसार महिला भगिनींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेचे अनेक महिलांकडून स्वागत केले जात आहे. परंतु बहीण म्हणून आम्हाला काहीतरी देताय, तसंच दाजींना पण काहीतरी द्या, अशी मागणी बहीणच विचारत असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हंटले आहे.
अमोल कोल्हे काय म्हणाले ?
अमोल कोल्हे म्हणाले की, “राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणुन महिला भगिनींना महिन्याला दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली ही चांगली बाब आहे. परंतु, त्याच बहिणीचे म्हणणे असेल लाडकी बहीण म्हणून जेवढे देता तेवढं दाजींना शेतीमालाला भाव द्या, दुधाला भाव द्या.”
पुढे ते म्हणाले, “ताई आणि दाजींच्या मुलांच्या शिक्षणासाठी सवलत द्यावी, शैक्षणिक वस्तू खरेदीत सवलत द्या, आरोग्य विभागात ताईसह दाजींना सवलत द्या,” अशा लाडक्या बहीणींच्या मागण्यात मांडत अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारला खोचक टोला लगावला आहे. तसेच राज्य सरकार बहिणींच्या या मागण्या मान्य करणार का? अस सवालही केला आहे. Amol kolhe On Ladki Bahin Yojana|
शिरुर शहरातील पंचायत वाडा याठिकाणी अमोल कोल्हे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला होता. त्यादरम्यान ते बोलत होते. मात्र या योजनेवरून राज्यभरात राज्याच्या राजकारणात अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहे.
दरम्यान, राज्यातील महिलांसाठी महत्त्वकांशी ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्र आणि नोंदणी प्रक्रियेसाठी ग्रामीण भागासह अनेक शहरात महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. Amol kolhe On Ladki Bahin Yojana|
हेही वाचा:
अखिलेश यादव यांच्यासाठी चंद्रशेखर आझाद नवीन आव्हान ; आझम खान यांच्याविषयीच्या ‘या’ विधानाने खळबळ





