SBI FD rate hike: स्टेट बॅंकेची ग्राहकांना मोठी भेट; एफडीवरील व्याज वाढवले, नवीन व्याजदर पहा

SBI FD rate hike: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने किरकोळ ठेवींवर (₹2 कोटी पर्यंत) ठराविक कालावधीसाठी मुदत ठेवींचे (FD) व्याजदर वाढवले आहेत. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर आजपासून (15 मे 2024) लागू झाले आहेत. (SBI FD rate hike: State Bank of India raises fixed deposit interest rates on these tenors. Check latest FD rates here)
एसबीआयने 46 ते 179 दिवस, 180 ते 210 दिवस आणि 211 ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 25-75 बेस पॉइंट्स (bps) व्याजदरात वाढ केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआय बँकेने 27 डिसेंबर 2023 रोजी एफडीवरील व्याजदरात अखेरची वाढ केली होती.
एसबीआयचे नवीन एफडी व्यादर पहा –
सामान्य नागरिकांसाठी –
7 दिवस ते 45 दिवस – 3.50%
46 दिवस ते 179 दिवस 5.50%
180 दिवस ते 210 दिवस – 6.00%
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 6.25%
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी – 6.80%
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – 7.00%
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी – 6.75%
5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंत – 6.50%
ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI FD दर –
7 दिवस ते 45 दिवस – 4%
46 दिवस ते 179 दिवस 6%
180 दिवस ते 210 दिवस – 6.5%
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 6.75%
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी – 7.30%
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – 7.50%
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी – 7.25%
5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंत – 7.5%





