Sayali Sanjeev : काळ्या रंगाच्या साडीत खुललं ‘सायली संजीव’चं सौंदर्य

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी गौरी म्हणजेच, अभिनेत्री ‘सायली संजीव’ आज महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये काम केले होते.
सायली संजीव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.
नुकतंच सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीतला फोटो शेअर केला आहे. काळ्या रंगाच्या साडीत सायलीच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, अनेक फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत. सायली मूळची नाशिक शहरातील आहे. दरम्यान कामाच्या निमित्ताने सध्या मुंबईत राहत आहे.





