‘शोले’चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे…; शरद पवार, संजय राऊतांवर भातखळकरांची खोचक टीका

मुंबई : देशात सध्या तिसऱ्या आघाडीचे वारे जोरात वाहताना दिसत आहे. कारण सत्ताधारी भाजप विरोधात आता सर्व विरोधक एकवटताना दिसत आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या बैठकीचे आयोजन केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय राजकारणातील चाणक्य (स्वयंघोषित) आणि भावी पंतप्रधान (हेही स्वयंघोषितच) यांनी आज दिल्लीत बैठक घेतली. त्यात जावेद अख्तरही होते.
‘शोले’चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे… त्यात ‘अन्ग्रेजो के जमाने के जेलर’च्या भूमिकेत संजयच हवा असा हट्टच साहेबांनी धरल्याची चर्चा आहे.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 21, 2021
यापूर्वी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची पहिली भेट झाल्यानंतरच पडद्याआड बरंच काही शिजत असल्याची चर्चा सुरू झाली होती.
त्यानंतर सोमवारी पुन्हा शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकांच्या सत्रावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.
काय म्हणाले अतुल भातखळकर
‘भारतीय राजकारणातील चाणक्य (स्वयंघोषित) आणि भावी पंतप्रधान (हेही स्वयंघोषितच) यांनी आज दिल्लीत बैठक घेतली. त्यात जावेद अख्तरही होते. ‘शोले’चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे… त्यात ‘अन्ग्रेजो के जमाने के जेलर’च्या भूमिकेत संजयच हवा असा हट्टच साहेबांनी धरल्याची चर्चा आहे.’





