Haryana School | हरियाणातील शाळांमध्ये ‘गुड मॉर्निंग’ ऐवजी ‘जय हिंद’ म्हणणे अनिवार्य होणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त येत्या 15 ऑगस्टपासून शाळांमध्ये हा आदेश लागू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना वाढवण्याच्या उद्देशाने हरियाणा सरकारच्या शिक्षण विभागाने ही अधिसूचना जारी केली आहे.
15 ऑगस्ट रोजी शाळांमध्ये देशभक्तीचे वारे वाहू लागतील आणि मुले एकमेकांना, आपल्या शिक्षकांना जय हिंद म्हणतील, अशा सूचना शिक्षण संचालकांनी जिल्हा व गट अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. परिपत्रकानुसार, ‘गुड मॉर्निंग’ ऐवजी ‘जय हिंद’ आता शाळांमध्ये वापरण्यात येणार आहे.
यामुळे विद्यार्थी दररोज ‘राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेने प्रेरित’ होऊन देशाच्या समृद्ध इतिहासाबद्दल आदर व्यक्त करतील. शालेय शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा गटशिक्षणाधिकारी, गट प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांना पाठवले आहे. Haryana School |
देशभक्तीपर अभिवादन ‘जय हिंद’ विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीरांच्या केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यास प्रोत्साहित करेल. मुलांचा सतत विकास व्हावा आणि देशाप्रती देशभक्तीची भावना जागृत राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने या अधिसूचनेत म्हटले आहे.
या अधिसूचनेत मुलांना ‘जय हिंद’ म्हणणे कोणत्या आधारावर बंधनकारक करण्यात आले आहे, याबाबत शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच ‘जय हिंद’चे महत्त्वही नमूद करण्यात आले आहे. लहान वयातच मुलांमध्ये देशाप्रती भावना जागृत व्हाव्यात यासाठी हरियाणा सरकारने हा निर्णय घेतला आहे. Haryana School |
हेही वाचा: