Sawai Gandharv Mahotsav : संगीतप्रेमी पुणेकरांची प्रतीक्षा संपली ! ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या तारखा जाहीर

Updated On:

Sawai Gandharv Mahotsav  – दरवर्षी आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आणि शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात जगभरात मान्यता असलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली. यंदा ७० व्या वर्षात पदार्पण करणारा ५ दिवसांचा हा महोत्सव मुकुंद नगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात दिनांक १८ ते २२ डिसेंबर दरम्यान संपन्न होईल. असं त्यांनी सांगितलं आहे.

शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या स्वरयज्ञाला पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून रसिक हजेरी लावतात. महोत्सवाच्या तारखा जाहीर झाल्या की अनेक रसिक त्यांचे पुण्यातील मुक्कामाचे नियोजन करतात.

गायन, वादन आणि नृत्याचा सुरेल मिफाल या महोत्सवात अनुभवायला मिळतो. दरवर्षी देशातील विविध संगीत घराण्यांच्या दिग्गज कलाकारांबरोबरच तरुण कलाकार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार, तसेच परदेशी कलाकार यामध्ये आपली कला सादर करून रसिकांचे कान आणि मन तृप्त करतात.

आणखी संबंधित बातम्या

Diwali Vacation: विद्यार्थ्यांची १९ दिवस दिवाळी

2026-10-09 07:53:50

Diwali Vacation: विद्यार्थ्यांची १९ दिवस दिवाळी

MPSC Protest: पुलावरील ठिय्या तात्काळ उठविण्याचे आदेश

2026-10-09 07:39:26

MPSC Protest:  पुलावरील ठिय्या तात्काळ उठविण्याचे आदेश

PMPML: नवरात्रोत्सवात देवींच्या शक्तीपीठांसाठी विशेष बससेवा

2026-10-09 07:32:38

PMPML: नवरात्रोत्सवात देवींच्या शक्तीपीठांसाठी विशेष बससेवा

Pune Municipal Corporation: झाडणकाम निविदा ; रस्त्यांच्या आकडेवारीची होणार सफाई

2026-10-09 07:30:11

Pune Municipal Corporation: झाडणकाम निविदा ; रस्त्यांच्या आकडेवारीची होणार सफाई

MPSC Protest: आंदोलनावर सुरूच ठेवण्यावर एमपीएससी विद्यार्थी ठाम

2026-10-09 07:24:50

MPSC Protest: आंदोलनावर सुरूच ठेवण्यावर एमपीएससी विद्यार्थी ठाम