Baba Adhav : आता सत्याग्रह करायला हवा, नाहीतर….; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव नेमकं काय म्हणाले?

पुणे: गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित कार्यक्रमात सत्याग्रही विचारधारा मासिकाच्या ‘गांधी विचार साहित्य संमेलन २०२५’ या विशेषांकाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आढाव यांनी आजचे राजकारणी हूकूमकशहा बनले आहेत. संवेदनशील झाले आहेत.
अशा वेळी सत्याग्रहाला, गांधींना मानणारे साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते असो की असो की, सर्वसामान्य माणूस असो, ज्यांच्या मनात विद्रोहाची वात तेवते आहे आहे, त्या सर्वांनीच अंतःकरणातला झरा मोकळा करायला हवा, आता सत्याग्रह करायला हवा. नाहीतर इतिहास माफ करणार नाही, अशा शब्दांत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.
देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे. विरोध करणारे आवाज दाबले जातात. मतपेटीतून विरोध व्यक्त करण्यासाठीही विश्वास राहिलेला नाही. विशिष्ट विचारसरणीचे लोक सत्तेत बसून हुकुमशाही पद्धतीने राज्यकारभार करत आहेत. गांधींच्या विचारांना न मानणारे लोक, त्यांच्याच पुतळ्याला नमस्कार करून राज्यकारभार चालवत आहेत, असे आढाव यावेळी बोलताना म्हणाले.
हृदयातल्या वेदनात कशा मांडाव्यात
उघड उघड लोकशाहीची विटंबना केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री दोन पक्ष फोडून आलो, असे सांगतात. ही परिस्थिती बघवत नाही. जाणकार नागरिक म्हणून हृदयातल्या वेदनात कशा मांडाव्यात, हा प्रश्न पडला असल्याचे आढाव यावेळी बोलताना म्हणाले. शेतकऱ्यांचे, कामगारांचे विद्यार्थ्यांचेही प्रश्न आहेत. मात्र भारतीय मन मेलेले नाही. लोक हुकूमशाही सहन करणारे नाहीत असे मत बाबा आढाव यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केले.





