Satish Wagh : सतीश वाघ हत्या प्रकरणात पत्नी मोहिनी वाघने केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

पुणे : सतीश वाघ हत्या प्रकरणात आता रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. मृत सतीश वाघ यांच्या पत्नी मोहनी वाघ यांनी त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती. मोहिनी वाघ यांचे मुलाचा मित्र अक्षय जावळकर सोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात सतीश वाघ हे अडथळा ठरत असल्याने पत्नी मोहिनीने त्यांच्या हत्येचा कट रचला. यासाठी तिने ५ लाखांची सुपारी दिली होती.
पोलीस तपासात नवा खुलासा
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोहिनी वाघ यांना काल (बुधवारी) अटक केली. तिने आज पोलिसांच्या चौकशीत मोठा खुलासा केला. मोहिनी वाघ हिने सुरुवातीला फक्त पतीचे हातपाय तोडण्याची सुपारी दिली होती. मात्र हल्लेखोरांना जेव्हा कळले की सतीश वाघ हे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत, तेव्हा त्यांनी त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. तसेच अपहरण करून खून केल्यानंतर आरोपींनी हत्यार भीमा नदीत टाकले.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
भाजप आमदार योगेश टीळेकर याचे मामा सतीश वाघ यांचं 9 डिसेंबरला पहाटे अज्ञात व्यक्तींकडून अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना चारचाकी गाडीतून अज्ञान स्थळी नेण्यात आलं. सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली होती. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं होतं.
सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला होता.





