– जयंत माईणकर Raghav Chadha : राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील भांडण किंवा पक्षांतर्गत वाद हा सध्याचा मोठा राजकीय विषय आहे. हा वाद आम आदमी पक्षाच्या अंतर्गत तणावामुळे उफाळून आला आहे की वेगळेच काही कारण आहे? स्वतःशिवाय दुसरं कुणी पुढे आलं की थेट गेम संपवायचा, ही वस्तुस्थिती सर्व राजकीय पक्षात लागू आहे. अण्णा हजारेंच्या सावलीत बसून केजरीवालांनी आम आदमी हा पक्ष (Raghav Chadha) तयार केला आहे. पण त्यांचा पक्ष म्हणजे ते एकटेच! दुसरं नेतृत्व आपल्याहून जास्त लोकप्रिय होत आहे, हे त्यांना कसं सहन होणार? वास्तविक ही स्पर्धा जीवनातील सर्व क्षेत्रात आहे. आपल्याहून वरचढ ठरू शकणार्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारे दूर केलं जातं. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्वच प्रकार वापरले जातात. चित्रपट क्षेत्रात अशा घटनांची कमी नाही. राजेश खन्ना-अमिताभ- विनोद खन्ना-शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील अशा स्पर्धेेच्या अनेक कहाण्या आहेत. पण राजकारणात चक्क संपवून टाकलं जातं. Raghav Chadha 2 एप्रिल 2026 रोजी आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेता पदावरून हटवलं.पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून सांगितलं की, चढ्ढा यांना पक्षाच्या वतीने (Raghav Chadha) बोलण्यासाठी वेळ देऊ नये. याऐवजी पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांची उपनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली. राघव चढ्ढा हे पूर्वी केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जात होते. पक्षाचा तरुण चेहरा, राज्यसभा खासदार आणि पंजाबमध्ये पक्षाचे प्रमुख चेहरे होते. केजरीवाल तुरुंगात असताना देखील ते पक्षातील महत्त्वाचे सदस्य होते. 2024 मध्ये केजरीवाल यांच्या अटकेनंतर चढ्ढा यांनी पक्षाच्या संकटकाळात फारसा सक्रिय सहभाग घेतला नाही. ते लंडनला गेले होते. डोळ्याच्या आजाराचा बहाणा केला असं सांगितलं जातं. ज्यामुळे पक्षात नाराजी निर्माण झाली. नेता तुरुंगात असताना सहकारी लंडनला का? असा प्रश्न पक्षात उपस्थित झाला. चढ्ढा यांनी राज्यसभेत मोदी सरकारविरोधात तीव्र प्रश्न विचारले, पण पक्षाच्या अंतर्गत मुद्द्यांवर किंवा केजरीवाल यांच्या बचावात ते फारसे बोलले नाहीत. मद्य घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांना क्लीन चिट मिळाल्यानंतरही ते शांत राहिले. पक्षात चढ्ढा यांचा वैयक्तिक ब्रँडिंग आणि लोकप्रियता वाढत असल्याचे काही नेत्यांना आवडले नाही. ते सॉफ्ट इश्यूज उदाहरणार्थ, विमानतळावरील समोसे ची किंमत, गिग वर्कर्स, पितृत्व रजा इत्यादी वर बोलतात, हे पक्ष नेते सॉफ्ट पीआर म्हणून टीका करत आहेत. आप नेत्यांनी चढ्ढा यांना मोदींना घाबरलेले आणि पक्षासाठी लढण्यास तयार नसलेले असं म्हणत हल्ला चढवला. आतिषी, सौरभ भारद्वाज, संजय सिंह यांसारख्या नेत्यांनी चढ्ढा यांच्यावर टीका केली. चढ्ढा यांनी डळश्रशपलशव, पेीं वशषशरींशव (खामोश केलं गेलंय, पण हारलेलो नाही) असा व्हिडिओ जारी केला. त्यात ते म्हणाले, ‘माझी शांतता ही माझी हार समजू नका.’ चढ्ढा यांनी सामान्य माणसाच्या मुद्द्यांवर (टॅक्स इंग्लंडसारखे, सुविधा सोमालियासारखे, डिजिटल अॅसेट्स कायदेशीर करणे इ.) भाषण दिले. ते म्हणाले की, ‘त्यांची खामोशी ही पक्षातील हाय कमांड विरुद्ध आहे, पण ते सामान्य जनतेसाठी लढणार आहेत.’ आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी चढ्ढा यांना डरपोक, पक्षाच्या संकटात सोडून गेलेला आणि भाजपकडे जाण्याची तयारी करणारा असं संबोधलं. काहींनी म्हटलं की, जो मोदींना घाबरतो तो देशासाठी कसा लढणार? चढ्ढा यांना पक्षात हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसते. भाजप नेते वीरेंद्र सचदेवा, कपिल मिश्रा यांनी या वादात आम आदमी पक्षाला अराजक आणि लुटारू गँग म्हणून टीका केली आहे. काही चर्चा अशाही आहेत की चढ्ढा यांचा भाजपशी संपर्क वाढू शकतो, पण त्याबाबत स्पष्ट पुरावा नाही. सद्यपरिस्थितीत राघव भाजपमध्ये जातील असं वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये जाणे किंवा उर्वरित चार वर्षे खासदार म्हणून बसणं हाच पर्याय राघव यांच्यासमोर आहे. पण अरविंद केजरीवालांना ते पचत नाहीये बहुतेक. आधी निवडणुका जिंकल्या. कारण जनतेचा माणूस अशी इमेज बनवली, पण आता काय? आता खरी रंगत दिसतेय. त्यातच राघव चढ्ढा यांची अभिनेत्री असलेली सुंदर पत्नी हेही द्वेषाचं एक कारण असू शकतं. कारण परिणीती चोप्रामुळे चढ्ढाना जास्त पब्लिसिटी मिळते. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान बनण्याची आपली महत्त्वाकांक्षा खुलेआम एका स्टेज शोमध्ये बोलून दाखवली होती. हा वाद आम आदमी पक्षाच्या अंतर्गत लोकशाही, निष्ठा आणि नेतृत्वाच्या प्रश्नांना उघड करतो. केजरीवाल यांचे एकेकाळचे ब्लू-आयड बॉय आता मात्र नावडते झाले आहेत. कारण, हा खरंच एक दमदार नेता रोजच्या आयुष्यात आपण जे त्रास सहन करतो पितृत्व रजा, महिलांचे पिरियड्सचे प्रश्न, एअरपोर्टवरील लूटमारसारखे दर हे मुद्दे तो उचलतो. म्हणजे कमीत कमी कुणी तरी आपल्यासाठी बोलतंय, असं वाटतं. राहुल गांधी यांच्यानंतर जर कुणी तरी लोकांचे प्रश्न उचलत असेल, तर ते राघव चढ्ढा आहेत आणि त्यांनाच सायलेंट करण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे काय? ‘मीच चेहरा, मीच पक्ष, मीच सगळं बाकी सगळे फक्त एक्स्ट्रा!’