सातारा : मांढरदेवमध्ये राजकीय पुढार्यांना गाव बंदी
Updated On:

मांढरदेव – सकल मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांचे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू असून त्यास दिवसेंदिवस अनेक गावातून विविध पद्धतीने पाठिंबा दिला जात आहे.
मांढरदेवमधील सकल मराठा समाजाकडून मांढरदेव गावात राजकीय पुढाऱ्यांना, नेत्यांना तसेच मंत्र्यांना जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत गाव बंदी करण्यात आलेली आहे.
मांढरदेव गाव महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याकारणाने येथील काळूबाई देवीच्या दर्शनाला संपूर्ण राज्यातून अनेक नेते, पुढारी तसेच मंत्री येत असतात. त्यामुळे येथील सकल मराठा समाजामार्फत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
कोणत्याही राजकीय व्यक्तीने गावात तसेच देवीच्या दर्शनासाठी येऊ नये अशी बंदी करण्यात आली आहे.





