वसंतगडचे जवान शंकर उकलीकर यांना वीरमरण
Updated On:

तांबवे -सैन्यदलात कार्यरत असलेले वसंतगड, ता. कराड येथील नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर (वय 38) यांनह लेह येथील बर्फाळ भागात सोमवारी (दि. 9) झालेल्या दुर्घटनेत वीरमरण आले. त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव उद्या (दि. 12) वसंतगड येथे येण्याची शक्यता आहे.
शंकर उकलीकर यांचे शिक्षण वसंतगड येथील जिल्हा परिषद शाळेत आणि माध्यमिक शिक्षण वि. ग. माने हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी पुढील शिक्षण कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात घेतले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले होते. ते 2001 साली सैन्यदलात भरती झाले होते.





