Satara : ग्रामपंचायत अधिकारी व आरोग्य सेवकांच्या बदल्या

सातारा : जिल्हा परिषदेच्या गट ‘क’ व गट ‘ड’ च्या कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली असून मंगळवारी २० ग्रामपंचायत अधिकारी व आरोग्य विभागातील आरोग्य सेवक व अन्य १६ कर्मचाऱ्यांच्या विनंती व आपसी बदल्या करण्यात आल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह खातेप्रमुखांच्या उपस्थितीत मंगळवारी दोन टप्प्यात ही प्रक्रिया राबवण्यात आली.
१९ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विनंती तर एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याची आपसी बदली करण्यात आली. आरोग्य विभागातील ४ आरोग्य सेवक (पुरुष), ३ सहाय्यक आरोग्य सेवक, १ आरोग्य पर्यवेक्षक, १ औषध निर्माण अधिकारी, २ आरोग्य सेवक (महिला), १ आरोग्य सहाय्यक यांची विनंती बदली करण्यात आली. १ आरोग्य सहाय्यक (पुरुष), ३ औषध निर्माण अधिकारी यांच्या आपसी बदल्या करण्यात आल्या.





