सातारा – राष्ट्रीय थांग स्पर्धेत आदर्श व राधिका यांचे यश

पुसेगाव – बुध येथील श्री नागनाथ विद्यामंदिर व ज्युनि कॉलेजचे विद्यार्थी आदर्श रवींद्र जगदाळे (सातवी) व राधिका संतोष बोराटे (आठवी) यांची अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय थांग ता स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती . झारखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आदर्श जगदाळे व राधिका बोराटे यानी ब्रॉंझ पदक मिळवले .
या दोन्ही विद्यार्थ्यांचा माजी प्राचार्य शेखर घाटगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोकनियुक्त सरपंच सौ. सुजाता बोराटे, माजी सरपंच अभयसिंह राजेघाटगे, पत्रकार प्रकाश राजेघाटगे यांनी अभिनंदन केले. प्रा. दतात्रय काळोखे, नाना दडस यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेष मार्गदर्शक अजित पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, माता पालक संघ सदस्य, तसेच विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, बुध पंचक्रोषी ग्रामस्थांनी अभिनंदन केले . तसेच श्री. खाडे यांचाही मान्यवरांनी सत्कार केला. भगवान सरवदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर श्री .संजय माने यानी आभार मानले.





