वडूज : खटाव तालुक्यात 10 अंगणवाडी सेविका व 59 मदतनीसांची होणार भरती होणार असून त्यासाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प अधिकारी संगीता खाबडे व व्ही. ए. ओमासे यांनी दिली.
अंगणवाडी सेविका पदासाठी भांडेवाडी, बनपुरी नवीन, पळशी, कामथी, चितळी, मोहिते मळा ,अंबवडे, वाकळवाडी, शिरसवडी, दहीवड या ठिकाणी भरती होणार आहे. तर मदतनीस पदासाठी गारवाड़ी आवळे पठार, वेटणे भाकरमळा, नेर बेघर, नेर खडवी, वर्धनगड होळीचा टेक, पवारवाडी डोंगरवस्ती, पुसेगाव रामोशीवस्ती, कटगु, काटकरवाडी, रेवलकरवाडी, गादेवाडी साळुंखेवस्ती, सांतेवाडी, शांतीनगर, डाळमोडी नाईक वस्ती, बोंबाळे गोसाव्याची वाडी 22.
तसेच कातरखटाव रानमळा, तडवळे पळेवस्ती, कणसेवाडी, लवळेवस्ती, एनकुळ खाडेमळा, एनकूळ नदवळेमळा, एनकुळ 55, पेडगाव सुभाषनगर, डांभेवाडी नलवडेवस्ती, तूपेवाडी, दातेवाडी जाधववस्ती, गणेशवाडी सावतामाळी नगर, गणेशवाडी बुरुंगलेवस्ती,नढवळ मानेवस्ती, नागाचे कुमठे बौध्दवस्ती, नागाचे कुमठे 112 ,हिंगणे वडाचा मळा, पारगाव पवारमळा, गिरजाशंकरवाडी, अंबेदारवाडी, गोरगाव वांगी वडारवस्ती, पळशी वाकळवस्ती, शेनवडी माळीमळा, रहाटणी निकमवस्ती, पुनवडी, मुसाडवाडी मोरेमळा, म्हासुर्णे, काळेवस्ती,म्हासुर्णे, बामणकीमळा, मरडवाक गोपाळवस्ती, गुंडेवाडी गावठाण, अनफळे पाइनवस्ती, मायणी येलगरवस्ती, कान्हरवाडी, लक्ष्मीपुरी मठ, कान्हरवाडी 87, कलेढोण बोबडेमळा, गारळेवाडी, गारुडी, पावणेवस्ती, मुळीकवाडी, मुळीकवस्ती, विखळे, मानेमळा.
औंध – 7, औंध गॅस एजन्सी, औंध 244,कळंबी- मांडवगण, त्रिमली जीपवारवस्ती, वरुड साळुंखेवस्ती, दहीवड, कातवडी गावठाण, वांझोळी – जाधववस्ती आदी रिक्त पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दि. १८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. अर्जांची छाननी आणि प्राथमिक यादी दि. २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. गुणवत्ता यादीस पडताळणी समितीची मान्यता दि. २८ ते ४ मार्च घेण्यात येणार आहे. नोटीस बोर्डावरील प्रसिध्द यादीतील उमेदवारांबाबत हरकती, आक्षेप, तक्रारीबाबत शहानिशा करुन गुणवत्ता यादीत दि. ५ ते १९ मार्च या कालावधीत सुधारणा करण्यात येणार आहे. दि. २० मार्च रोजी अंतिम यादीमधील भरावयाच्या पदासाठी गुणानुक्रमानुसार उमेदवारांची निवड करुन त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.