सातारा – महसूल सहाय्यकाला लाचप्रकरणी पोलीस कोठडी
Updated On:

वडूज – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अटक करण्यात आलेला खटाव तालुक्यातील महसूल सहाय्यक प्रवीण धर्मराज नांगरे (वय 42, रा. तडवळे, ता. खटाव) याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बांधकामासाठी लागणारी क्रश सॅंड आणि क्रश खडी भरलेले डंपर खटावच्या तहसीलदारांनी गुरुवार (दि. 16) जप्त केले होते. हे डंपर सोडवण्यासाठी वडूज येथील तहसील कार्यालयातील प्रवीण नांगरे याने तक्रारदाराकडे 55 हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांगरे याला काल (दि. 22) रंगेहाथ पकडले होते. त्याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलीस उपअधीक्षक सचिन राऊत तपास करत आहेत.





