सातारा : घरफोडीत 71 हजारांचा मुद्देमाल चोरीस
Updated On:

सातारा : येथील कोल्हटकर आळी, मंगळवार पेठेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातून सोन्याचे दागिने चोरुन नेले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऐवजांमध्ये मंगळसूत्र, सोन्याची अंगठी, सोन्याची साखळी याचा समावेश असून एकूण 71 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आहे.
ही चोरी दि. 8 डिसेंबर रोजी घडली असून याप्रकरणी रविंद्र मारुती गायकवाड (वय 52, रा. मंगळवार पेठ) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.





