सातारा : युनिव्हर्सलमध्ये साकारली तंत्रज्ञानाची पंढरी

विद्यार्थ्यांनी साकारले विविध उपक्रम
सातारा – येथील युनिव्हर्सल नॉलेज स्कूलमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित TECH FEST-2024-25 या अंतर्गत विविध नवोपक्रमांवर प्रयोग साकारण्यात आले. NEP-2020 मधील नवीन शैक्षविक धोरणांनुसार नियमित पाठयक्रमासोबतच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती अवगत करून घेणे ही काळाची गरज आहे. हा उद्देश समोर ठेवून हा नाविन्यपूर्ण उपकम शाळेकडून राबविण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुथा फाऊंड्रीजचे चेअरमन आणि डायरेक्टर अजित मुथा यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व युवा वैज्ञानिकांनी वैयक्तिक पातळीवर विविध साधन-सामग्रींचा वापर करून आपले उपक्रम सादर केले.
विविध औषधिय गुणधर्म असलेल्या वनस्पतींपासून काही जीवनावश्यक वस्तू ही विद्यार्थ्यांनी साकारल्या. या कार्यक्रमासाठी शहरातील विविध शाळांना आमंत्रित केले गेले. यावेळी पालक उपस्थित होते.
इयत्ता दहावीतील आयुष काळे, आर्या देशपांडे तर इयत्ता आठवीतून मुकुंद जाधव व सातवीमधील अवंतिका काटकर या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास शाळेचे चेअरमन नितीन माने,उपप्राचार्या सौ. रोशनी चंदनखेडे, व्यवस्थापक. सौ. नवनिता पटेल,शिक्षक,विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





