सातारा – सेंद्रिय शेती कार्यशाळाचे भुईंज येथे आज आयोजन

भुईंज – शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी प्रशिक्षण देण्याकरिता कृषी विभाग व आत्मा सातारा यांचे मार्फत डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत भुईंज येथे गुरुवार, दि 28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता साईविश्व मंगल कार्यालयात तालुकास्तरीय सेंद्रिय शेती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक विकास बंडगर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत शेतकऱ्यांना जैविक खते,जैविक कीटकनाशके तयार करणे तसेच सेंद्रिय पद्धतीने शेतमाल पिकवणे व त्याची विक्री व्यवस्था करणे याबाबत तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.यासाठी नारायणगाव,पुणे येथील शाश्वत शेती फाउंडेशनचे संचालक सुजित पाटे, व कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषयतज्ञ संग्राम पाटील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
भुईंज कृषी मंडळात 500 हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण,शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत कृषी निविष्ठा तयार करण्यासाठी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी,सेंद्रिय शेतमाल विक्रीव्यवस्था इ.साठी जैविक शेती मिशन अंतर्गत अनुदान उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाईचे तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी केले आहे.





