satara news : पावशेवाडी येथे श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा

बामणोली – अनुगामी लोकराज्य अभियानाच्यावतीने पावशेवाडी (बामणोली), ता. जावळी येथे श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा नुकताच झाला. अयोध्येत 22 जानेवारीला होणार्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनुगामी लोकराज्य अभियानाच्यावतीने अनुलोमच्या सक्रिय वस्तीमित्रांना श्रीराम मूर्ती व प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि टाळ-मृदंगांच्या गजरात श्रीराम मूर्तीचे आगमन पावशेवाडीत झाले. कार्यक्रमात अनुलोमचे सामाजिक योगदान आणि त्यात वस्ती मित्रांची भूमिका या विषयी माहिती देण्यात आली.
भरत पवार, हरिबा पवार, किसन पवार, आनंद पवार, ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष पवार, आनंद को. पवार, बाळू शिंदे, गणपत शिंदे, शंकर डिगे, बबन शिंदे, आनंद वि. पवार, सचिन पवार, सागर पवार, ओमकार डिगे, शिवराज पवार, कमल पवार, सुगंधा पवार, विमल पवार, सखुबाई पवार, लक्ष्मी डिगे, मालू पवार उपस्थित होत्या.





