Satara News: कोयनानगर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का !
Updated On:

सातारा (प्रतिनिधी)- कोयनानगर व पोफळी परिसराला आज भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल. आज दि. १७ जुलै रोजी दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला.
भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या पश्चिमेला १० किलोमीटरवर आणि १५ किलोमीटरम खोलीवर होता. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर अंतरावर आहे. या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नाही. तसेच कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू आहे. तर सातारा शहरात ढगाळ वातावरण राहत आहे. काहीवेळा सूर्यदर्शनही घडत आहे. तर पूर्व भागात पावसाची उघडीप कायम आहे.





