Satara News : विजेच्या तारेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
Updated On:

कोयनानगर : कोयना विभागातील मेंढेघर (कदमवाडी) येथे वादळी वाऱ्यामुळे तुटून जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का बसून शेतकरी मनोहर अंबाजी कदम (वय ५५) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कदम सकाळी गुरे चारण्यासाठी शेतात गेले होते. संध्याकाळी गुरे घरी परतली. मात्र, मनोहर घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी शेताच्या माळरानावर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्याच ठिकाणी वाऱ्यामुळे तुटून पडलेली विद्युत तारही दिसून आली. अचानक स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.





