Satara News : कराडमधून (Satara News) शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या नीलमचा अपघात झाला. तब्बल १ वर्ष २७ दिवस ती कोमात राहिली. अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. अमेरिकेतील रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला. लाडक्या लेकीच्या अकाली मृत्यूने वडिलांचे हृदय पिळवटले. पण आखाती देशातील युद्धामुळे त्यांना कराडातून (Satara News) लेकीच्या अंत्यविधीलाही जाता आले नाही, हे दुर्दैव. कराड तालुक्यातील वडगाव- उंब्रज येथील नीलम तानाजी शिंदे (वय ३६) ही तरूणी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजता कॅलिफोर्नियात रस्त्याने चालत जात असताना नीलमला वाहनाने पाठीमागून धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र, अपघाताच्या दिवसापासून ती कोमामध्येच होती. Satara News शक्य ते सर्व उपचार करूनही निलमच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा (Satara News) झाली नाही. सुमारे तेरा महिने तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर २८ मार्च २०२६ रोजी उपचार सुरू असतानाच तिचे निधन झाले. नीलमच्या मृत्यूची बातमी वडगाव येथे कुटुंबीयांना समजताच त्यांना शोक अनावर झाला. मात्र, आखाती देशातील युद्धांमुळे वडिलांसह कोणालाही अमेरिकेला जाणे शक्य झाले नाही. अखेर 7 एप्रिल 2026 रोजी अमेरिकन वेळेनुसार दुपारी 1 वाजता ‘माऊंट व्हेमन मेमोरियल पार्क याठिकाणी नीलमच्या देहावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अमेरिकेत स्थायिक असलेली नीलमची आत्या या विधीसाठी उपस्थित राहणार आहे. अवयव दान करण्याचा निर्णय 1) नीलमच्या अकाली मृत्यूने गहिवरलेल्या कुटुंबीयांनी या परिस्थितीतही अत्यंत उदात्त निर्णय घेतला. 2) नीलमचे अवयव दान करण्याचा निर्णय घेत कुटुंबीयांनी त्यासाठीची सर्व कागदोपत्री प्रक्रिया पार पाडली. 3) कुटुंबीयांच्या निर्णयानुसार नीलमचे डोळे आणि त्वचा दान करण्यात आली असून ज्यामुळे इतरांना नवजीवन मिळणार आहे. अपघातानंतर ‘व्हिसा’साठीही कुटुंबीयांची धडपड नीलमचा अपघात झाल्यानंतर अमेरिकेला जाण्यासाठी वडिलांसह कुटुंबीयांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली होती. अमेरिकेला जाण्यासाठी त्यांना तातडीने व्हिसा मिळत नव्हता. अखेर शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर वडील तानाजी शिंदे आणि मामा संजय कदम यांना यूएस वाणिज्य दूतावासाकडून व्हिसा देण्यात आला. त्यानंतर ते अमेरिकेला गेले होते.