Satara News : कोरेगावात विहिरीत आढळला अनोळखी युवकाचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु
शहरालगत एकंबे रस्त्यावरील प्रसिद्ध दुर्गा भोजनालय परिसरातील मेळावणे यांच्या शेतातील (Satara News) विहिरीत रविवारी सकाळी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Satara News : शहरालगत एकंबे रस्त्यावरील प्रसिद्ध दुर्गा भोजनालय परिसरातील मेळावणे यांच्या शेतातील (Satara News) विहिरीत रविवारी सकाळी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
कोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगावचे पोलीस पाटील दीपक शिंदे यांना माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोबाइलद्वारे कॉल करून विहिरीत मृतदेह (Satara News) दिसत असल्याची माहिती दिली.
त्यानंतर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता विहिरीच्या पाण्यात पालथ्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह दिसून आला.घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
संबंधित विहीर सुमारे ४० ते ५० फूट खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी महाबळेश्वर येथील रेस्क्यू पथकाची मदत घेण्यात आली. रेस्क्यू पथकाचे संजय पार्टे व सहकाऱ्यांनी विशेष साधनांच्या साहाय्याने विहिरीत उतरून मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढला.
पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडे (Satara News) चौकशी केली असता मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. मृत युवकाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी कोरेगाव उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार संबंधित युवकाचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून कोरेगाव पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.





