Koregaon Tree Plantation : कोरेगावला ‘ग्रीन सिटी’ बनवणार! डॉ. प्रिया शिंदेंचे नागरिकांना पर्यावरण रक्षणाचे आवाहन
Koregaon Tree Plantation : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोरेगाव नगरपंचायत आणि भाजपचा पुढाकार; तिळगंगा नदी स्वच्छता मोहिमेसह स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण संपन्न.

Koregaon Tree Plantation – पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण आणि संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरणरक्षणाचे कार्य सुरू आहे. कोरेगाव शहर हिरवेगार करण्यासाठी दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प आहे. त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सौ. प्रिया शिंदे यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोरेगाव नगरपंचायतीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक आणि भाजपच्यावतीने तिळगंगा नदी स्वच्छता मोहीम आणि श्री केदारेश्वर मंदिराजवळील कैलास स्मशानभूमी मार्गावर वृक्षारोपण शुक्रवारी सकाळी करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे, जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव जगदाळे, माजी सदस्य किरण बर्गे, राजू भोसले, जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष गजानन बर्गे, बाजार समितीचे संचालक संजय बर्गे, नगराध्यक्ष दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिन बर्गे, राजेंद्रबुवा बर्गे, नितीन ओसवाल, प्रीतम शहा, अॅड. अमोल भुतकर, रशीद शेख, माजी उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, नगरसेवक सागर बर्गे,भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राहुल बर्गे म्हणाले, आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय, स्मशानभूमी, पाणीपुरवठा योजना परिसर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली आहेत. यापुढे प्रत्येक प्रभागात वृक्षारोपण मोहीम गतिमान करण्यात येईल. ही झाडे जगवण्याची जबाबदारीही स्वीकारली जाणार आहे.
कोरेगाव होईल पर्यावरणपूरक शहर
तीळगंगा नदी शहरामधून वाहत असून, नदीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. आमदार महेश शिंदे यांच्या दूरदृष्टीने हे काम सुरू असून, पहिला टप्पा पूर्णत्वाकडे गेला आहे. उर्वरित दोन टप्पे नजीकच्या काळात पूर्ण केले जाणार आहेत. शहरातील दोन्ही स्मशानभूमींच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आली आहे. नजीकच्या काळात कोरेगावची ओळख पर्यावरणपूरक शहर अशी होईल, असा विश्वास राहुल बर्गे यांनी व्यक्त केला.





