Accident news : कार आणि मोटारसायकलच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Updated On:

पाटण – तालुक्यातील गुजरवाडी गावानजीक खंडू आई मंदिराच्या वळणावर स्विफ्ट कार आणि मोटरसायकल या वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने राहुल संजय पवार (वय 43 रा. सैदापूर’ ता. जि. सातारा) या दुचाकीस्वारांना मृत्यू झाला आहे.
रविवारी दुपारी बाराच्या वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अंकुश लक्ष्मण झोरे (रा. धारेश्वर, ता. पाटण) स्विफ्ट कारने (एमएच 14 एलएल 8727) पाटणकडून सातारच्या दिशेने चालले होते.
तर होर्नेट दुचाकी (एमएच 11 सीएल 9360) चालवत दुचाकीस्वार राहुल संजय पवार सातारच्या बाजूकडून पाटणला येत होते. दरम्यान खंडूआई मंदिराच्या नजिकच्या वळणावर दोन्ही वाहनांमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघाताची नोंद मल्हार पेठ पोलीस ठाण्यात उशिरा झाली आहे.





