सातारा । ‘किसन वीर’मध्ये उद्या मिल रोलर पूजन

भुईंज – किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-25 च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन सोमवार, दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नितीन पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कारखान्याला एनसीडीसीमार्फत कर्ज मंजूर झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने शेतकरी व कामगारांच्या विश्वासावर मागील दोन हंगाम कोणत्याही बँकेचे वित्तसहाय्य न घेता यशस्वी करून दाखवले. सन 2024-25 चा गळीत हंगामही याच विश्वासाच्या जोरावर यशस्वी करण्यात येणार असून, शेतकर्यांनी आपला ऊस किसन वीर कारखान्यालाच घालावा. मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे सभासद, हितचिंतक, कंत्राटदार, वाहनमालक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व संचालकांनी केले आहे.





