सातारा | किसन वीर यांची जयंती उद्या कारखान्यावर होणार साजरी
Updated On:

भुईंज – थोर स्वातंत्र्यसेनानी आणि किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, किसन तथा आबासाहेब महादेव वीर यांची जयंती सोमवार, दि. 26 रोजी कारखाना कार्यस्थळावर साजरी करण्यात येणार असल्याची माहिती व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
किसन वीर यांच्या जयंतीदिनी कारखाना कार्यस्थळावर सकाळी 10 वाजता कारखान्याचे चेअरमन तथा आमदार मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांमधील कार्यकर्ते, कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगरसभासद शेतकरी, वाहतूक कंत्राटदार, तोडणी मशीन मालक, विविध संस्थांच्या पदाधिकार्यांनी कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे आणि संचालक मंडळाने केले आहे.





