सातारा : इंग्रजी भाषेला आंतरराष्ट्रीय महत्त्व – प्रा. अँथनी थॉमस

पुसेगाव – जागतिकीकरणामुळे इंग्रजी भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच इंग्रजी भाषेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. असे मत प्रा.अॅथनी थॉमस यांनी व्यक्त केले.
पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालय इंग्रजी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष या विभागाच्या वतीने ‘संवाद कौशल्य’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा .एस ए. माळी, प्रा.डॉ.एन.डी. लोखंडे प्रा.डॉ. एस. आर. शिंदे उपस्थित होते.
थॉमस म्हणाले, संपर्क रोजगार शिक्षण इत्यादी क्षेत्रात इंग्रजी भाषेला खूप महत्त्व आहे जगात आपण कोणत्याही देशात गेलो तर इंग्रजी भाषेचे ज्ञान असल्यानंतर संवादासाठी कोणतीच अडचण येत नाही इंग्रजी भाषा उत्कृष्ट येण्यासाठी इंग्रजीचे व्याकरण, उच्चारण, इंग्रजी शब्दांचा साठा भरपूर प्रमाणात असेल तरच प्रभावीपणे आपणास बोलता येऊ शकते असा आत्मविश्वास व्यक्त केला.
प्रा. एस .ए .माळी म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतील संवाद कौशल्य आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असते .असे सांगितले. प्रमुख पाहुणे यांची ओळख व स्वागत प्रा. एस. ए. माळी यांनी सांगितले.
डॉ. एन. डी लोखंडे यांनी प्रास्तविक केले. प्रा. डॉ. एस. आर. शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.





