सातारा : ज्ञानवर्धिनीमध्ये क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन

सातारा – ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या बालक व अभिनव विद्या मंदिर, अभिनव माध्यमिक विद्यालय शाहूपुरी या तीनही शाखांचा संयुक्त २७ व्या वार्षिक कीडामहोत्सवाचे उद्घाटन क्रीडा महोत्सव प्रमुख सचिन जाधव, शालाप्रमुख सौ. प्राची गावडे, मुख्यध्यापक संतोष सापते व बालवाडी विभाग प्रमुख सौ. नंदिनी चोरगे, विदयार्थी प्रतिनिधी आदित्य क्षीरसागर व विद्यार्थीनी प्रतिनिधी मैथिली कुरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांनी कीडा ज्योत सवाद्य आणली. शालाप्रमुख, क्रीडा महोत्सव प्रमुख ,विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा ध्वजारोहण करून क्रीडा महोत्सव प्रमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. सचिन जाधव म्हणाले, सर्व विद्यार्थ्यांनी सांघिक भावनेने, खिलाडू वृत्तीने सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा.हार, जीत सर्व स्पर्धांमध्ये असतेच.स्पर्धांमुळे जिंकण्यांची जिद्द निर्माण होते.
या क्रीडा महोत्सवात धावणे,गोळाफेक, थाळी फेक. भालाफेक, चेंडूफेक, दोर उडी, उंचउडी, बेडूक उडी, या वैयक्तिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. रिले, खो – खो, कबड्डी, लगडी पळती, डॉजबॉल या सांधिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या क्रीडा स्पर्धाचा बक्षिस वितरण सोहळा शनिवार दि. १६ रोजी अभिनव विद्या मंदिर या शाळेसमोरील मैदानावर घेण्यात येणार आहे.





