सातारा – गुरूकुल स्कूलचा माजी विद्यार्थी मिहीर जोशी बनला चार्टड अकौंटंट

सातारा – येथील शाहूनगरमधील गुरूकुल स्कूल या इंग्रजी माध्यम शाळेचा माजी विदयार्थी मिहीर मकरंद जोशी याने पहिल्या प्रयत्नात चार्टड अकौंटंट बनण्याचा बहुमान मिळवला. या दैदिप्यमान यशाबद्दल समाजाच्या विविध स्तरातून मिहिरचे अभिनंदन व कौतुक होत आहे. त्याच्या यशाबद्दल गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी त्याचा सत्कार केला.
यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा कदम, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सौ. सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे उपस्थित होते.
राजेंद्र चोरगे म्हणाले, मिहीर जोशी याने मिळविलेले यश गुरुकुल शाळेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आहे तसेच याचा आम्हाला, सर्व संचालक, शिक्षक, विदयार्थी व पालकांना अभिमान आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास घडविण्याबरोबरच ौक्षणिक उपक्रम व इतर क्षेत्रात सुध्दा विदयार्थी उज्वल कामगिरी करत आहेत. विदयार्थ्योंच्या सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे उद्दिट आहे. यासाठी सर्व शिक्षक, विदयार्थी व पालक यांचे योगदान महत्वाचे ठरत आहे.
त्याच्या या यशस्वी कामगिरीबद्दल आनंद गुरव, मधुकर जाधव, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दीपक मेथा, जगदीश खंडेलवाल, हरिदास साळुंखे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.





