सातारा – शेतकरी उत्पादक खरेदी, विक्री संमेलन उत्साहात

सातारा – इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतर, पुरवठा व्यवस्थापन करणे, इंटरनेट आधारित विपणन, ऑनलाईन ट्रान्झंक्शन प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक डेटा आंतरबदल, वस्तुसूची व्यवस्थापन प्रणाली आणि स्वयंचलित डेटा संग्रहण याबद्दल माहिती देणार, शेतकरी उत्पादक खरेदी विक्री संमेलन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे संपन्न झाले.
सर्व समुदाय आधारित संस्थांना स्मार्ट प्रकल्पांतर्गत मंजूर उपप्रकल्प विनाविलंब उभारणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यांना येणाऱ्या विविध अडचणीवर मार्गदर्शन केले. दर महिन्याला शेतकरी उत्पादक कंपनीसाठी एक खरेदीदार-विक्रेता संमेलन आयोजित करण्याचे नियोजन केले असल्याचे देखील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले
कृषी विभागास ट्रेसेबिलीटी नेट मध्ये नोंदणीकरिता लक्षांक प्राप्त झाला असून ट्रेसेबिलीटी नेट मध्ये आपल्या फळबागा तसेच भाजीपाला पिकांचे प्लॉट नोंद करण्याचे आवाहनही श्रीमती फरांदे यांनी केले. यावेळी जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट सातारा कार्यालयातील राजेंद्र गोरडे, अर्थशास्त्रज्ञ तथा वित्त प्रवेश सल्लागार तसेच जीवन कदम आदी उपस्थित होते.





