Satara: राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत सातारा जिल्ह्याला उपविजेतेपद
Satara या स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे श्रेया शेखर बाबर, सौख्यदा सचिन लेंभे, आदिती नंदराज निंबाळकर, मनस्वी मनोजकुमार जाधव, गायत्री संतोष गलांडे, श्रेया कानिफनाथ जाधव या सातारा जिल्हातील सहा खेळाडू मुलींची पंजाब येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र मुंबई संघात निवड झाली आहे.

Satara: असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने हँण्डबॉल असोसिएशन सातारा व ज्ञानदीप स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज वाई यांच्या संयुक्त विद्यमाने 48 वी महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युनिअर मुली हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धा2026 पार पडली. यामध्ये सातारा जिल्हा संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
या स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे श्रेया शेखर बाबर, सौख्यदा सचिन लेंभे, आदिती नंदराज निंबाळकर, मनस्वी मनोजकुमार जाधव, गायत्री संतोष गलांडे, श्रेया कानिफनाथ जाधव या सातारा जिल्हातील सहा खेळाडू मुलींची पंजाब येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र मुंबई संघात निवड झाली आहे.
उपविजेतेपद मिळविणार्या संघात प्राची प्रेमचंद कुमार, श्रीजा अजय पिसाळ, तनिष्का यशवंत चव्हाण, आदिती दत्तात्रय जगताप, आरती संतोष निषाध, तनिष्का अभिजित भोसले, ज्ञानेश्वरी नवनाथ चव्हाण, सायली शिवाजी जाधव, वैभवी मंगेश हगवणे, तनुश्री सतीश माने या विद्यार्थीनींचा समावेश होता.
निवड झालेल्या खेळाडू, संघाचे खासदार तथा सातारा जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशन अध्यक्ष नितीन पाटील, एकनाथ जगताप, चद्रकांत ढमाळ, बाळकृष्ण पवार, चद्रकांत शिंदे, विश्वनाथ पवार, जिजाबा पवार, दिलीप चव्हाण, प्रा. दत्तात्रय वाघचवरे, विजय कासुर्डे, रवींद्र केंजळे, दुष्यंत जगदाळे, दत्ता मर्ढेकर, प्राचार्या शुभांगी पवार, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, कॅप्टन समीर पवार, विक्रम निकम, साहील इनामदार यांनी अभिनंदन केले. विजेत्या संघाला सचिन लेंभे, अमित वाघांबरे, शिवराज वरे यांचे मार्गदर्शन लाभले.





