Satara: सातार्यात उद्यापासून ‘रचना एक्स्पो’
Satara महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र त्यागी, राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा आणि महाराष्ट्र स्टेट चेअरमन प्रकाश मेंडा यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

Satara: घर खरेदीचे स्वप्न पाहणारे ग्राहक, बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणारे नागरिक आणि आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाची माहिती घेणार्यांसाठी सातार्यात उद्यापासून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा शाखेच्या वतीने आयोजित ‘रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2026’ चे उद्घाटन गुरुवार, दि. 26 रोजी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पोलीस परेड ग्राऊंडवर सलग चार दिवस चालणार्या या प्रदर्शनात घर, फ्लॅट, बांधकाम साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे विविध पर्याय नागरिकांना एकाच ठिकाणी अनुभवता येणार आहेत.
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र त्यागी, राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा आणि महाराष्ट्र स्टेट चेअरमन प्रकाश मेंडा यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सातारा शाखेचे चेअरमन कौस्तुभ मोरे, व्हाईस चेअरमन हर्षद वालावलकर, सेक्रेटरी नीलेश शिंदे, खजिनदार शरद जाधव यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेच्या वाटचालीतील हे 36 वे वर्ष असून रचना प्रदर्शनाचे यंदा चौदावे वर्ष आहे. बदलत्या बांधकाम क्षेत्रातील नवीन संकल्पना, अत्याधुनिक यंत्रसामग्री, बांधकामासाठी लागणारे साहित्य आणि गृहसजावटीचे पर्याय नागरिकांसमोर आणण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. यंदा 100 हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून नामांकित बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांचे विविध गृहप्रकल्प सादर केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, घर खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना विविध गृहप्रकल्पांची तुलना करण्याची संधी मिळणार आहे. नव्या फ्लॅटसाठी नोंदणी करू इच्छिणार्यांना वित्तीय संस्थांच्या माध्यमातून गृहकर्जविषयक माहितीही उपलब्ध होणार आहे. बांधकाम साहित्यापासून आधुनिक मशिनरीपर्यंत अनेक पर्याय येथे पाहता येणार असल्याने ग्राहक, बांधकाम व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांसाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रदर्शनाच्या कालावधीत बांधकाम व्यावसायिकांकडून विविध आकर्षक योजनाही जाहीर केल्या जाणार आहेत. यंदा प्रदर्शनासाठी पोलीस परेड ग्राऊंडची निवड करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण मंडपात कार्पेटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे धुळीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. वाहनांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज पार्किंगची सुविधाही उपलब्ध असेल. यंदा तीन लाखांहून अधिक नागरिक प्रदर्शनाला भेट देतील, असा आयोजकांचा अंदाज आहे.
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2026 हे प्रदर्शन 26 ते 29 नोव्हेंबरदरम्यान दररोज सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार असून प्रवेश विनामूल्य आहे. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्यापूर्वी हीींिीं:/र्/ीाींर्.ीीहर.ले.ळप/ीशसळीीींरींळेप/ीरलहरपरर्-ींळीळीेीं या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या प्रदर्शनाला स्कॅन इन्फ्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया, कंग्राळकर असोसिएट्स, उत्थान एलिव्हेटर्स, नवनिर्मिती बिल्डर्स आणि परफेक्ट हाऊस प्रा. लि. यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.





