Satara : घरकुल बांधकाम निधीची मागणी आता ऑनलाईन

सातारा : विविध ग्रामीण आवास योजनेतील टप्पा निहाय घरकुल बांधकाम निधीची मागणी आता लाभार्थी ऑनलाइनरित्या मागवू शकणार आहे. याबाबत ग्रामीण विकास यंत्रणेकडून सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लाभार्थी अथवा ग्रामपंचायत अधिकारी टप्पा निहाय बांधकाम हप्त्याची मागणी करु शकतात. त्यामुळे लाभार्थींना आणखी गतीने घरकुल बांधकामासाठी निधी मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सातारा मार्फत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, प्रधानमंत्री-जनजाति आदिवासी न्याय महा अभियान, रमाई आवास योजना–ग्रामीण, मोदी आवास घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत- योजना (वैयक्तीक), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, अटल बांधकाम कामगार आवास इत्यादी आवास योजना राबविल्या जात आहेत.
सद्यस्थितीत घरकुलाचे टप्पा निहाय बांधकाम झाल्यावर लाभार्थी किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून (दुसरा, तिसरा, चौथा/ अंतिम) हप्त्याची मागणी कागदपत्रे पंचायत समितीमध्ये सादर करून होत असते. त्यामुळे लाभार्थीला टप्पा निहाय बांधकामाचा हप्ता वितरण करण्यास तसेच ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांमार्फत बांधकामास प्रत्यक्ष भेटी देऊन जिओ टॅग करण्यास विलंब होत असतो. आता यावर मार्ग काढून लाभार्थी अगर ग्रामपंचायत अधिकारी मार्फत ऑनलाईनरित्या टप्पा निहाय बांधकाम हप्त्याची मागणी करण्याची सुविधा निर्माण केली असल्याचे नागराजन यांनी सांगितले.
गुगल फॉर्म (लिंक) चा वापर केल्यामुळे लाभार्थीचा दिवस वाया जाणार नाही, प्रवास खर्चाची बचत होणार आहे. जलद गतीने हप्ता वितरण करण्याची कार्यवाही सुलभ होणार आहे. नरेगा कक्षामार्फत अकुशल मनुष्य दिन निर्मिती बाबत नियंत्रण राहून सर्व लाभार्थींना अकुशल मजूरीचा पूर्ण लाभ देणे सोयीचे होणार आहे. स्वच्छ भारत मिशन कक्षामार्फत शौचालय प्रोत्साहन अनुदान मागणी प्रस्ताव बाबत माहिती उपलब्ध होणार आहे. लाभार्थी मोबाईल क्रमांक उपलब्ध झाल्याने तालुकास्तरावरुन लाभार्थी सोबत समन्वय करता येणार आहे. पंचायत समिती मधील घरकुल बांधकाम हप्ता मागणी करीता येण्या-या लाभार्थींची गर्दी कमी होणार आहे.
यापुढे दुसरा, तिसरा व चौथा/ अंतिम हप्ता मागणीसाठी फिजिकली कागदपत्रे येऊ नयेत असे निर्देश सर्व गटविकास अधिकारी यांना जिल्हास्तरावरुन दिले आहेत. या गुगल फॉर्म (लिंक) ची माहिती तालुक्यातील मंजूरी दिलेल्या सर्व घरकुल लाभार्थींना तसेच संबधित ग्रामपंचायत अधिकारी यांना तालुकास्तरावरुन देण्याबाबत सुचना दिल्या आहेत, अशी माहिती ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी दिली.
तालुकानिहाय गुगल फार्म लिंक
जावली : https://forms.gle/qYprsKfzkk8wp1L17
कराड : https://forms.gle/1tvkjW6wjYeP8QsR6
खंडाळा : https://forms.gle/G8zxMGo1UQiDBKe6A
खटाव : https://forms.gle/QD8hDh2b6c8sjm419
कोरेगाव : https://forms.gle/YK8HLEUU6jTn8Hex8
महाबळेश्वर : https://forms.gle/EfLbFNQ8sAXAaxoXA
माण : https://forms.gle/36TnRBFdN7osrc7w8
पाटण : https://forms.gle/i57uXzY4jf9WJYtH7
फलटण : https://forms.gle/y23XUyeS1Kdj1Gcd9
सातारा : https://forms.gle/GdHoimu27b2DnpaS9
वाई : https://forms.gle/SiB8effS1yN1Lz1P9
घरकुल बांधकाम दुसरा, तिसरा, चौथा, अंतिम हप्ता मागणी करिता प्रत्येक तालुक्यामार्फत स्वतंत्र गुगल फॉर्म (लिंक) तयार करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थीं किंवा ग्रामपंचायत अधिकारी घरकुल लाभार्थीं विषयी प्राथमिक माहिती भरुन त्यामध्ये घरकुल लाभार्थीं बांधकामाच्या सद्यस्थितीत बाबत फोटो व हप्ता मागणी प्रपत्र (लाभार्थीं व ग्रामपंचायत अधिकारी यांचे सहीचे) अपलोड करुन हप्ता मागणीची नोंदणी करु शकणार आहे.
– याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी





