Satara Crime: भरवस्तीत घरात घुसून राडा; महिलेचं ५० हजारांचं सोनं हिसकावून तिघं पसार

प्रभात वृत्तसेवा
लोणंद – घरात घुसून मारहाण, शिवीगाळ, घरगुती साहित्य व दुचाकीचे नुकसान करत महिलेकडील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, दि. 3 रोजी रात्री बोरी, ता. खंडाळा येथील हर्षदा लक्ष्मण शिखरे यांच्या फिर्यादीनुसार, घरात घुसून अवधूत बळवंत मोरे यांनी त्यांच्या पतीस मारहाण केली.
त्याचवेळी सुनिता बळवंत मोरे यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. दरम्यान, कोयल अवधूत मोरे हिने घरातील फ्रिज, मिक्सर तसेच घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीवर दगड टाकून नुकसान केले. यानंतर तिने फिर्यादीच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाचे सुमारे 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोप आहे.
फिर्यादी हर्षदा शिखरे यांच्या तक्रारीवरून लोणंद पोलीस ठाण्यात सुनिता बळवंत मोरे, अवधूत बळवंत मोरे व कोयल अवधूत मोरे (सर्व रा. बोरी, ता. खंडाळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सोनवलकर करत आहेत.





