सातारा जिल्ह्यात आणखी २० पाँझिटिव्ह; जिल्ह्याने द्विशतक ओलांडले, रुग्णसंख्या २०१

सातारा- जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात २० जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या २०१ झाली आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.गुरुवारी रात्री आठ वाजता ४ जणांचा पाँझिटिव्ह रिपोर्ट आला. तर रात्री ११ वाजता आणखी १६ जण पाँझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली.
संस्थात्मक अलगीकरणात दाखल असलेला मुंबई येथून आलेला भीमनगर ता. कोरेगांव येथील २७ वर्षीय युवक, संस्थात्मक अलगीकरणात असलेला मायणी ता. खटाव येथील ६४ वर्षीय पुरुष, इंजिनिअरींग कॉलेज संस्थात्मक अलगीकरणात असलेला धामणी ता. पाटण येथील निकट सहवासतील ७२ वर्षीय पुरुष, इंजिनिअरींग कॉलेज संस्थात्मक अलगीकरणात असलेला शामगाव, कराड येथील निकट सहवासातील २४ वर्षीय पुरुषवरोशी ता. जावली येथील निकट सहवासातील ५२ वर्षीय महिला, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल असलेले मोजावाडी ता. खटाव येथील ५३ वर्षीय पुरुष सारीचा रुग्ण, मुंबई येथून आलेला आसरे ता. वाई येथील 50 वर्षीय पुरुष, गारवडी ता. खटाव येथील निकट सहवासातील २१ वर्षीय महिला, मुंबई येथून आलेला फलटण येथील ६३ वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली फलटण येथील ५८ वर्षीय महिला, रायघर ता.सातारा येथील निकट सहवासातील २६ वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला कास खुर्द येथील २४ वर्षीय पुरुष, आसनगाव ता. सातारा येथील निकट सहवासातील ३६ वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला निमसोड ता. खटाव येथील २० वर्षीय व ४८ वर्षीय पुरुष, कोपरखैरणे मंबई येथून आलेला गवडी ता. जावली येथील १९ वर्षीय पुरुष अशा एकूण १६ जणांचा अहवाल करोनाबाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.





