सातारा, (प्रतिनिधी) – सणासुदीच्या दिवसांत नवा व्यवसाय उभारू इच्छिणार्या व्यावसायिकांकडून सातारा शहरात व्यापारी संकुलास विशेष पसंती दिली जात आहे. मोक्याची जागा, सोयीसुविधा व या प्रकल्पाच्या निमित्ताने येवू घातलेल्या आधुनिक व्यापार संस्कृतीमुळे व्यावसायिक व ग्राहकांचे लक्ष बॉम्बे रेस्टॉरंट चौकात साकारलेल्या ‘सातारा सेंटल’ या संकुलाकडे वेधले जात आहे. पुणे-बंगळूर महामार्ग व सातारा पंढरपूर राज्यमार्गावर असल्याने भविष्यतील गुंतवणुकीसाठी सातारा सेंट्रल मोक्याचे ठिकाण ठरले आहे. शहराचा विस्तार पूर्वेला वाढला असून या नागरिकांच्या सर्व प्रकारच्या खरेदी, मनोरंजन व पोटपूजेची सुविधा एकाच ठिकाणी मिळत असल्याने हा प्रकल्प लक्षवेधी ठरत आहे. या प्रकल्पात एस्कलेटर्सच्या अत्याधुनिक सुविधा मिळत असल्याने शहराची महानगराकडे होत असलेली वाटचाल अधोरेखित झाली आहे. शहराच्या हद्दवाढीमुळे, औद्योगिक वसाहती वाढल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गालगतच्या वसाहती विस्तारत आहेत. याच भागात सर्वांगसुंदर व्यावसायिक वास्तु उभी राहत असल्यामुळे व्यापार्यांना व्यवसाय व ग्राहकांना खरेदीसाठी नवीन आकर्षण केंद्र ठरणार आहे. सातारा सेंट्रल या कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये चोखंदळ ग्राहकांसाठी मिस्टर डी. जे. वाय व इतर नामांकित ब्रॅडस दाखल होणार आहेत. प्रकल्पातील सोयीसुविधा व भविष्यातील व्यवसायवृध्दीच्या खात्रीमुळे व्यापारी सातारा सेंट्रलला पहिली पसंती देत आहेत. पाच मजल्यांच्या भव्य, अत्याधुनिक सातारा सेंट्रल या व्यापारी संकुलामध्ये सहा एस्कलेटर्स व 4 लिफ्ट्स, एक सर्व्हिस लिफ्ट असून पहिल्या 3 मजल्यांवर शोरुमसाठी गाळे आहेत. दुसर्या मजल्यावर सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक फूड कोर्ट, मनोरंजनासाठी रेक्लीनर चेअर्सचे थिएटर असून तिसर्या तळमजल्यावर 5 हजार चौरस फुटांचे अँट्रोयम आहे. प्रत्येक मजल्यावर पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे अंडरग्राऊंड तसेच प्रशस्त ओपन पार्किंग व्यवस्था आहे. या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक व व्यवसाय वाढीच्या भरपूर संधी आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी तसेच विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर नवीन व्यवसाय करण्यासाठी या प्रकल्पाला भेट द्यावी, असे आवाहन अरुण शिंदे यांनी केले आहे.