Satara : परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी केंद्र सरकार पुरस्कृत नॅशनल ओव्हरसीझ परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या सन २०२५-२६ या वर्षासाठी www.nosmsje.gov.in या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर २७ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते.
अधिक माहितीसाठी संबंधित संकेतस्थळावरील १७ पानांची माहिती उपलब्ध आहे. राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्तीची केंद्रीय क्षेत्र योजना अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेती कामगार आणि पारंपारिक कारागीर श्रेणीतील कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेऊन मास्टर डिग्री किंवा पीएच.डी अभ्यासक्रमांसह उच्च शिक्षण करुन घेण्यास त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अवर सचिव, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, नवी दिल्ली ११000१ यांचे कार्यालयास सादर करावयचा आहे.





