सातारा | मारहाण करून दुचाकी चोरणार्यास अटक

सातारा – येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयानजीक दुचाकीस्वाराला अडवून, मारहाण करत दुचाकी चोरुन नेल्याप्रकरणी दत्तात्रय उत्तम घाडगे (वय 30, रा. दौलतनगर, करंजे) याला शहर पोलिसांनी एका अटक केली. हा संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक दुचाकीस्वार काल (दि. 17) जिल्हा रुग्णालयानजीकच्या रस्त्याने जात असताना, दत्तात्रय घाडगेने त्याला अडवले. दुचाकीस्वाराला दांडक्याने मारहाण करून, घाडगेने दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर, सातारा शहर पोलिसांनी वेगाने तपास केला. संशयिताचे वर्णन जाणून घेत, घाडगेला अवघ्या 24 तासांत पकडण्यात आले. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश माने, फौजदार सुधीर मोरे, सुजीत भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, संतोष घाडगे यांनी ही कारवाई केली.





