सातारा – आरोग्य अधिकारी, कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

सातारा – सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी, कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली. या सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
चेअरमन डॉ. आर. बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस व्हाइस चेअरमन नरेंद्र सणस, संस्थापक-संचालक तथा औषध निर्माण संघटनेचे अध्यक्ष शहाजी गुजर, वाईचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव, तुषार निकम, रेखा माळके, शैनाज शेख, संचालक सुनील खामकर, सुनील कोळे, प्रवीण देशमुखे, तानाजी धुमाळ, सौ. शिल्पा शिंदे, रमेश पाटील, बाळासाहेब सातपुते, सौ. जबीन सय्यद, सौ. सुषमा सिरसाम, सौ. गीतांजली नलवडे, संभाजी सावंत, सौ. सुरेखा कुंभार, शेखर गायकवाड, सचिन वेल्हाळ, सौ. मृदुला पाटील उपस्थित होत्या.
संस्थेत नवीन सभासदवाढ, संस्थेतील खर्चावर नियंत्रण आणून, त्याचा लाभ सभासदांना होण्यासाठी उपययोजना, संस्थेच्या मुदत ठेवींमध्ये लक्षणीय वाढ, सेवानिवृत्त सभासदाने संस्थेत मुदत ठेव ठेवल्यास अर्धा टक्का जादा व्याज, कर्जाची मर्यादा आठ लाखांवरुन दहा लाख करणे, मागेल त्या सभासदास कर्ज देणे याबाबत सुनील खामकर यांनी माहिती दिली.
डॉ. आर. बी. पाटील यांनी संस्थेच्या भावी वाटचालीची माहिती दिली. शहाजी गुजर यांनी संस्था स्थापन करताना आलेल्या अडचणींची माहिती दिली. संस्थेने राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक करुन, यापुढेही नवीन सभासद वाढवणे, दिलेल्या कर्जाच्या वसुलीचे नियोजन व संस्थेचे भागभांडवल कसे वाढेल, याबाबत मार्गदर्शन केले. शैनाज शेख म्हणाल्या, आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांनी एकत्र येऊन संस्थेची उन्नती केली आहे. यापुढेही सर्वांनी एकत्र काम करुन संस्था नावारुपाला आणूया.
यावेळी संस्थेच्यावतीने सेवानिवृत्त कर्मचारी, सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. संस्थेचे सचिव अजित पवार, लेखनिक वंदना पोफळे, प्रवीण गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला. विशाल रेळेकर यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र सणस यांनी आभार मानले.





