सातारा – जुगारप्रकरणी आठ जणांवर कारवाई 50 हजारांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

सातारा – सातारा शहर पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या छाप्यात आठ जणांवर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. एक रोजी क्षेत्र माहुली, ता. सातारा गावच्या हद्दीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागील बाजूस भिंतीच्या आडोशाला जुगार घेतल्याप्रकरणी संदेश सुरेश खरात (रा. चंदन नगर कोडोली), चंद्रकांत श्रीरंग पवार (रा. क्षेत्र माहुली, सातारा), अझर मणेर (रा. शनिवार पेठ, सातारा) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 23 हजार 550 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत सातारा-फलटण रस्त्यावरील वाढे चौकाजवळ असणाऱ्या हॉटेल शिवनेरी शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला संतोष मोहन गुरव (रा. काशीळ, ता. सातारा), राजेश संपत कदम (रा. करंजे पेठ, सातारा), जाकीर शमशुद्दीन शेख (रा. काशीळ, ता. सातारा), समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा, सातारा), चंद्रमणी धनंजय आगाने (रा. कोडोली, सातारा) यांच्याकडून 25 हजार 705 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.





