पिंपोडे बुद्रुक येथील एकावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल
Updated On:

वाठार स्टेशन – जातिवाचक शिवीगाळ व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी पिंपोडे बुद्रुक येथील एकावर पोस्कोअंतर्गत वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा योगेश दत्तात्रय पवार (रा. पिंपोडे बुद्रुक) दोन महिने वारंवार पाठलाग करत असत. ही बाब मुलीच्या बहिणीच्या लक्षात आल्यानंतर तिने योगेशच्या बहिणीला त्यास समजावून सांगण्यास सांगितले. घरच्यांकडे तक्रार केल्याचा मनात राग धरून योगेश याने दारू पिऊन अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन जातीवाचक शिवीगाळ व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या घटनेची फिर्याद वाठार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम तपास करीत आहेत.





