सातारा – साडेसहा लाखांच्या फसवणूकप्रकरणी महिलेवर गुन्हा
Updated On:

सातारा – स्नेहल रवींद्र कुलकर्णी (रा. शाहूपुरी, सातारा) यांची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नीलिमा दत्तात्रय कुलकर्णी (सध्या रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, स्नेहल कुलकर्णी यांनी व्यवसाय वाढीसाठी नीलिमा कुलकर्णी यांना दि. 9 जानेवारी ते जून 2023 या कालावधीत सात लाख रुपये दिले होते. या पैशांची मागणी स्नेहल कुलकर्णी यांनी केली असता, त्यातील 47 हजार रुपये नीलिमा कुलकर्णी यांनी दिले. उर्वरित सहा लाख 53 हजार रुपये देण्यास नीलिमा कुलकर्णी या टाळाटाळ करत असल्याने स्नेहल कुलकर्णी यांनी फिर्याद दाखल केली आहे. हवालदार दळवी तपास करत आहेत.





