महामार्गावर डिव्हायडर तोडून आदळली कार
Updated On:

सातारा – महामार्गाचे सहा पदरीकरण झाल्यामुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा राहिलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक अपघातही घडत असतात. शनिवारी (दि. 23) रोजी दुपारी लिंब, ता. सातारा गावच्या हद्दीत असलेल्या महामार्गावर गौरीशंकर कॉलेजनजीक भरधाव वेगाने जाणारी कार डिव्हायडर तोडून दुसर्या कारवर आदळली. हा अपघात पाहणार्या अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
सुदैवाने दोन्ही कारमधील प्रवाशांचे किरकोळ दुखापतीवर निभावले. मात्र, भरधाव वेगाने काय होवू शकते याचा अनुभव काहींनी प्रत्यक्षात घेतला.





